खानापूर (प्रतिनिधी): खानापूर शहरात कोरोनाच्या वाढत्या रूग्णांची सोय व्हावी. यासाठी श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समितीच्या वतीने आयोजीत श्रीमहालक्ष्मी कोविड केअर सेंटरला सुरूवात करण्यात आली आहे. या कोविड सेंटरला तालुक्यातुन अनेक दानशुर व्यक्तीनी वस्तू स्वरूपात अथवा अन्नधान्य स्वरूपात मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच प्रमाणे खानापूर येथील समृध्दी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने संस्थापक संजय कुबल, अध्यक्ष पिराजी कुराडे व संचालक मंडळाच्यावतीने श्रीमहालक्ष्मी कोविड केअर सेंटरमधील रूग्णासाठी पाच हजार रूपयाचा धनादेश कोविड केअर सेंटरचे अध्यक्ष किरण येळ्ळूरकर व सचिव सदानंद पाटील यांच्याकडे सूपूर्द केला.
कार्यक्रमाला संचालक यशवंत गावडे, राजू जांबोटकर, हरि गोरल, शाहु अगनोजी, सेक्रेटरी जोतिबा अलोळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
