खानापूर : खानापूर शहरातील रामदेव स्वीटमार्ट समोर ऊसाची वाहतूक करणारी ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर दोन ट्रॉली जोडून ऊस वाहतूक करत होता त्यापैकी एक ट्रॉली पलटी झाल्याने रस्त्याशेजारी उभी असलेल्या मारुती व्हॅन व बोलेरोवर ऊस कोसळल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. खानापूर शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे त्यात वाहतुकीचे नियोजन नाही त्यामुळे हा अपघात झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अपघातानंतर थोडा वेळ वाहतुकीत व्यत्यय आला होता. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाहतुकीस मार्ग मोकळा करून दिला. खानापूर शहरात रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता तरी लोकप्रतिनिधी आणि संबंधित खाते रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष देतील का?
Belgaum Varta Belgaum Varta