खानापूर : ओलमणी गावाजवळ खासगी बस उलटून अनेक जण जखमी झाले. सदर बस गोव्यातील मडगावहून बैलूर गावाकडे जात होती. बसमधील लोक लग्न समारंभासाठी जात होते.
पहाटे 4.30 च्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वजण बरे होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अपघातात बस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta