छत्रपती शंभूराजे परिवाराचा आदर्शदायी उपक्रम
खानापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांची सद्यस्थिती खूपच दयनीय आहे. या गडकोटाना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवकर्यातील अनेक संघटना कार्यरत आहेत. याच अनुषंगाने छत्रपती शंभूराजे परिवार यांच्या वतीने श्री पावणाई देवीच्या परमपवित्र भूमीत अर्थात किल्ले श्री सडा येथे वार शनिवार 24/12/2022 व रविवार 25/12/2022 रोजी गडकोट स्वच्छता,संवर्धन व दीपोस्तव कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. सदर मोहिमेसाठी सातारा, नाशिक, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, खानापूर इत्यादी विभागातून दूर्गसेवक, दुर्गसेविका बालदुर्गसेवक मोहिम यशस्वी करण्यास सहकार्य करणार आहेत.
अधिक माहितीसाठी व आर्थिक मदतीसाठी संपर्क
संदेश वाळुंज पाटील 7057202308, विठ्ठल ल. देसाई 9845527017, सौरभ चा. सांबरेकर 9112914558
Belgaum Varta Belgaum Varta