खानापूर : येत्या 4 डिसेंबर 2022 पासून खानापूर तालुक्यातील एसएसएलसी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील एकूण 6 केंद्रात मराठी माध्यमासाठी व 3 केंद्रात कन्नड माध्यमासाठी या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर या संस्थेची बैठक नुकताच खानापूर येथे झाली त्यावेळी ही माहिती देण्यात आली. ज्ञानवर्धिनीचे संचालक मंडळ, सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व विषय तज्ञ शिक्षक उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्ञानवर्धिनीचे संस्थापक पीटर डिसोझा हे होते.
गेल्या 14 वर्षांपासून ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. मध्यंतरी कोविड महामारीच्या कारणाने दोन वर्षे खंड पडला तरी नव्या उमेदीने या वर्षी हे कामकाज सुरू झाले आहे. डिसेंबर महिन्यात तीन रविवार हा उपक्रम सुरू असून फ्रेब्रुवारी महिन्यात प्रज्ञावंत व्याख्यान माला घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
सुरवातीला देसुर हायस्कूलचे मुख्याध्यापक संचालक एस. पी. धबाले व संचालक एन. एम. देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्याध्यक्ष बी. जे. बेळगावकर यांनी प्रास्ताविक केले. उद्योजक सुधीरचंद्र पाटील (मुबई), निवृत्त प्राचार्य पी. के. चापगावकर (कारवार), निवृत्त मुख्याध्यापक एम. डी. पाटील, संचालक मनोहर होनगेकर (बेळगाव), मुख्याध्यापक सी. एस. कदम (ओलमनी हायस्कूल), के. एम. पाटील (गर्लगुंजी), श्रीमती वाय. व्ही. पाटील (नंदगड), पी. एस. कोलकार (हालशी), एन. बी. पाटील (बैलूर) यांनी व्याख्यानमाले संदर्भात सूचना मांडल्या. विषय तज्ञ म्हणून सौ. एस. आय. रोटी, सौ. नीलम देसाई, श्री. एस. एस. सावंत, के. बी. गुरव, ए. जे. सावंत, पी. के. पाटील, एस. एस. लाड, अजित कांबळे, जे. बी. मूतगेकर, श्री. बिसनाल यांनी चर्चेत भाग घेतला संचालक महेश सडेकर (जांबोटी) यांनी सूत्रसंचालन केले.
एम. डी. पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta