खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र जनावरांच्या लम्पी रोगाने धुमाकूळ घातला असून खानापूर तालुक्यातील जनावरांना या लम्पी रोगाची लागण झाली आहे. सध्या खानापूर तालुक्यात जवळपास ७३ जनावरे दगावली आहेत.
यासाठी भाजपचे बेळगांव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी पशु खात्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एस. कोटगी यांची भेट घेऊन सविस्तर माहिती घेतली. तालुक्यातील ८२६७४ जनावरे असून ५६२५९ जनावरांना डोस दिले आहेत. ५७८ जनावरे लम्पी रोगाने त्रस्त आहेत. तेव्हा शेतकरी वर्गाने आपल्या जनावरांना वेळेत लसीकरण करून घेऊन त्याच्या आजाराकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.
खानापूर तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकार डाॅ. ए. एस. कोटगी यांनी तालुक्यातील प्रत्येक गावातील जनावरांच्या आजाराची काळजी घेत आहेत.
एकीकडे लसीचा पुरवठा अपूरा होत असला तरी जास्तीत जास्त जनावरांच्या लम्पी रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
शेतकरी वर्गाच्या लम्पी रोगाने मयत झालेल्या बैलाला ३० हजार रुपये परीहार धन दिले जाणार आहे, तर गायीला २० हजार रूपये परिहार धन दिले जाणार आहे. तेव्हा शेतकरी वर्गाने आपल्या जनावराची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घ्यावी व लम्पी रोगापासुन जनावरांचा बचाव करावा, असे आवाहन बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी व भाजप नेते किरण यळ्ळूरकर यांनी केले आहे
यावेळी भाजपचे तालुका सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, कौदल ग्राम पंचायत सदस्य उदय भोसले, प्रकाश निलजकर, बबन यळ्ळूरकर आदी उपस्थित होते.