खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांनी दिल्यामुळे गेली २५ वर्षे नगरसेवक म्हणून उच्चांक गाठलेले ज्येष्ठ नगरसेवक नारायण मयेकर यांची बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून शुक्रवारी दि. २ डिसेंबर रोजी निवड झाली.
यावेळी निवडून अधिकारी तहसीलदार प्रविण जैन होते.
यावेळी नगरपंचायतीच्या १९ नगरसेवकांनी नारायण मयेकर यांचा अर्ज निवडून अधिकारी तहसीलदार प्रविण जैन यांच्याकडे सादर केला.
नगराध्यक्षाच्या निवडीसाठी एकच अर्ज दाखल आल्याने नगराध्यक्ष पदाची बिन विरोध निवड जाहिर करण्यात आली.
यावेळी चीफ ऑफिसर आर के वटार यांनी नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांना हार घालून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजप नेते विठ्ठल हलगेकर, स्थायी कमिटीचे चेअरमन प्रकाश बैलूरकर, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, माजी नगराध्यक्ष मजहर खानापूरी, नगरसेवक तोहिद चंदकण्णावर, लक्ष्मण मादार, आप्पया कोडोळी, विनायक कलाल, नारायण ओगले, हणमंत पुजारी, विनोद पाटील, महम्मद रफिक वारेमणी, फातिमा बेपारी, मिनाक्षी बैलूरकर, लता पाटील, सहारा सनदी, शोभा गावडे, मेघा कुंदरगी, जया भुतकी, राजश्री तोपिनकट्टी व कर्मचारी वर्गानी शाल, पुष्पहार घालून अभिनंदन केले.
यावेळी प्रकाश बैलूरकर, मेघा कुंदरगी, विनायक मुतगेकर, भरमाप्पा पाटील आदीची भाषणे झाली.
यावेळी खानापूर शहरातुन विजयाची मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
नारायण मयेकर पाच वेळा नगरसेवक झाले, स्थायी कमिटी चेअरमन झाले, उपनगराध्यक्ष झाले व आता नगराध्यक्षही झाले. त्यांच्या पत्नी सुनीता मयेकर या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. तर त्यांची ऐश्वर्या मयेकर या सुध्दा रामगुरवाडी ग्राम पंचायत अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांचे खानापूर शहरात अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta