खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर पोलिस ठाण्याचे सीपीआय सुरेश सिंगेची बदली झाली. त्यांच्या जागी नुतन सीपीआय म्हणून मंजुनाथ नायक नियुक्ती झाली. त्यांनी नुकताच खानापूर सीपीआय म्हणून सुत्रे स्विकारली.
यानिमित्त खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने खानापूर पोलिस ठाण्याच्या नुतन सीपीआय मंजुनाथ नायक यांचे स्वागत शनिवारी खानापूर पोलिस ठाण्यात करण्यात आले.
यावेळी खानापूर तालुका भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कुबल यांच्या हस्ते पुष्पहार घालुन पेठे भरवुन स्वागत केले.
यावेळी ज्येष्ठ नेते किरण यळ्ळूरकर, मिडीया राजेंद्र रायका, सुरेश देसाई, मल्लापा मारीहाळ, प्रकाश निलजकर, सदानंद मासेकर, शाहु अकनोजी, जोतिबा अल्लोळकर, याचबरोबर सिध्दया हिरेमठ, बसू हिरेमठ, लियाकत बिचणावर, दशरथ बनोशी आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी संजय कुबल, किरण यळ्ळूरकर यांनी खानापूर शहरातील पार्किंग समस्या याशिवाय खानापूर शहरासह तालुक्यातील समस्येबाबत नुतन सीपीआय मंजुनाथ नायक यांच्याकडे चर्चा केली. सीपीआय मंजुनाथ नायक यांनी खानापूर शहरासह तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी आपले सहकार्य मोलाचे आहे, असे सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta