खानापूर : खानापूर फोटोग्राफर असोसिएशच्या वतीने 6 डिसेंबर रोजी शुभम गार्डन येथे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष दीपक गुरव, भाजपा नेत्या सोनाली सरनोबत, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, खानापूर भाजपा अध्यक्ष संजय कुबल, समाजसेवक रवी कोटगी, ज्ञानेश्वर ओलकर, अमित पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांनी छायाचित्रण कौशल्या विषयी माहिती दिली तर डॉ. सोनाली सरनोबत यांनी छायाचित्रणाचे असंघटित क्षेत्र आणि आवश्यक संघटक वृत्ती याबद्दल माहिती दिली तसेच छायाचित्रण कलाकौशल्य वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी फोटोग्राफर्स आणि त्यांच्या अत्याधुनिक उपकरणांचा विमा आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. बदलत्या काळानुसार कौशल्य आणि तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याचेही सरनोबत यांनी सांगितले. यावेळी विठ्ठल हलगेकर, संजय कुबल, प्रमोद कोचेरी यांनीही फोटोग्राफर्सना मार्गदर्शन केले तसेच फोटोग्राफर असोसिएशनच्या प्रत्येक सदस्याला ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले.