खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने आयोजित गुरूवारी दि. ८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या खुल्या पुरूष मॅरेथॉन स्पर्धेतील प्रथम क्रमांक रोहित रामा, व्दितीय क्रमांक मोनू कुमार तर तृतीय क्रमांक अनंत गावकर अबनाळी (खानापूर) यांना गोव्यात आयोजित समारंभात गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बक्षीस समारंभाच्या गोव्याचे राजपाल रमेश तेवडकर, दि. जांबोटी मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलासराव बेळगाकर, उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, संचालक मनोहर डांगे, यशवंतराव पाटील, मारूती मादार, विद्याधर बनोशी, खाचापा काजुनेकर, विश्व भारती क्रीडा संकुलनचे अनिल देसाई, कार्यदर्शी भैरू पाटील, दामोदर कणबरकर, विनोद गुरव, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थापक विलासराव बेळगावकर म्हणाले की, आमच्या सोसायटीला ३० वर्षे पूर्ण झाली.
यानिमित्ताने मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ही सामाजिक बांधिलकी ओळखून विविध उपक्रम राबविले आहेत. आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. हे आमचे भाग्य आहे.
Belgaum Varta Belgaum Varta