खानापूर (प्रतिनिधी) : रामापूर (ता. खानापूर) गावातील मन्सूर भयभेरी यांच्या घराला शनिवारी पहाटे शाॅर्टसर्किटने आग लागल्याने घरच्या छतासह संपूर्ण घर जळून खाक झाले.
घरचे मालक मन्सूर हे बॅटरी दुरूस्तीचे काम करतात, अशी माहिती समोर आली आहे.
केरळ बॅटरी दुरूस्तीसाठी चार्जिंगला लावल्या असताना शाॅर्टसर्किटने घराला आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घरामध्ये जवळपास २० बॅटऱ्या होत्या. त्यामुळे हा अनर्थ घडला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
यावेळी स्थानिक पोलिस, इतर अधिकारी वर्गाने भेट देऊन माहिती घेतली व पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta