खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यकीची बैठक सोमवारी दि. १२ रोजी संपन्न झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष नागेश सातेरी होते.
तर व्यासपीठावर राज्य अध्यक्ष ही अमजत, राज्य सेक्रेटरी एम. जय्याप्पां, राज्य संघटना कार्यदर्शी रत्ना शिरूर आदी उपस्थित होत्या.
प्रास्ताविक व स्वागत होऊन कार्यक्रमाची सुरूवात झाली.
बैठकीचे औचित्य साधून तालुका अंगणवाडी कार्यकर्त्याच्या संघटना पदाधिकारी वर्गाची निवड करण्यात आली.
तालुका अंगणवाडी संघटनेच्या अध्यक्षपदी मेघा मिठारी, उपाध्यक्ष पदी सरीता पेडणेकर, सेक्रेटरी अनिता पाटील, खजानजी भारती पै, ज्योती बोबाटे, रोसन शेख, सुजाता चलनाद्वारे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.
बैठकीत येत्या २२ डिसेंबरला “बेळगाव चलो” कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे औचित्य साधून निवृत्त झालेल्या कार्यकर्त्या व सहाय्यकीचा शाल, पुष्पहार, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
बैठकीला खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्या व सहाय्यकी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.