खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील धनगर गवळी समाजाच्या मुलभुत समस्यांवर चर्चा करण्यासाठी तहसिल कार्यालयात मंगळवारी दि. १३ रोजी पार पडली.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे आमदार शांतराम सिद्दी होते. यावेळी उपतहसीलदार के. वाय. बिद्री, अध्यक्ष अप्पू शिंदे, राज्य समितीचे उपाध्यक्ष भैरू पाटील व राज्य समिती संघटन सचिव बम्मू पाटील, कार्यदर्शी विठ्ठल पाटील, व राज्य समिती सदस्य नवलू आवणे, गंगाराम बवदाने, संजू पाटील, बेळगाव जिल्हा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी धनगर गवळी समाजाच्या वतीने विधान परिषद सदस्य शांताराम सिद्दी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालुन सत्कार केला.
यावेळी बेळगाव जिल्ह्यातील धनगर गवळी समाजाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी धनगर गवळी समाजातील प्रमुख वागू पाटील व अनेक धनगर गवळीबांधव उपस्थित होते. बैठकीत धनगर गवळी समाजातील अनेक ज्येष्ठांनी सहभाग घेतला होता.