खानापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत त्यातच राज्यातील २१ साखर कारखान्यावर सरकारने धाड टाकून चौकशी सुरू केली. त्यात आपल्या जिल्ह्यातील ७ ते ८ साखर कारखान्याचा समावेश आहे. या धाडीत साखर कारखाने वजन काट्यात तफावत असल्याचे दिसून आले. अशा साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान केले. ती नुकसानभरपाई द्यावी. महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाने ३०७५ रूपये दर देत आहेत. पंधरा दिवसांत उसाची बीले देत आहेत. मात्र बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने २५०० ते २७०० रूपये दर देत आहेत. उसाच्या बिलाना ही विलंब होत आहे. हेस्काॅक खाते वीजपुरवठा सुरळीत करत नाही. शेतकऱ्यांच्या पिकासाठी सात तास थ्रीफेस वीजपुरवठा करावा. जंगली प्राण्यापासून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे.
या समस्या येत्या १९ तारखेपासून बेळगाव येथे होणाऱ्या अधिवेशनात खानापूर तालुक्याच्या लोकप्रतिनिधी मांडाव्यात, असे मत रयत संघटनेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष अशोक यमकनमर्डी यांनी शनिवारी दि. १७ रोजी खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्राम धामात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी बेळगाव जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष अशोक यमकनमर्डी, गुरूलिगय्या पूजेर, शिवाजी अंबडगठी, शिवानंद जगळी, विठ्ठल सातण्णावर, मंजुळा हुलीकट्टी आदी उपस्थित होते.