खानापूर (प्रतिनिधी) : लोकाळी जैनकोप गावच्या ग्रामदेवता लक्ष्मी यात्रा २३ वर्षानंतर येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. यानिमित्ताने लक्ष्मी देवीच्या गदगेच्या जागेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परशराम पाटील होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, किरण यळ्ळूरकर, सुरेश देसाई, युवा नेता पंडित ओगले, राजेंद्र रायका, मोहन पाटील, आदी उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पहार घालुन स्वागत करण्यात आले.
यावेळी पंडित ओगले, सुरेश देसाई, संजय कुबल, किरण यळ्ळूरकर, राजेंद्र रायका, विठ्ठल हलगेकर आदीची भाषणे झाली.
प्रास्ताविक व स्वागत तुकाराम सावंत यांनी केले
यावेळी कार्यक्रमाला यात्रा कमिटी अध्यक्ष नारायण पाटील, गावचे पंचकमिटी परशराम पाटील, मर्यापा पाटील, ग्राम पंचायत सदस्य मोहन पाटील, रामभाऊ पाटील, हणमंत वालेकर, आपाणा पाटील, प्रेमानंद सुतार, रवळू पाटील, कल्लापा गुरव, संभाजी गुरव गुरूजी, भाऊराव मुतगेकर, सचिव नामदेव पाटील आदी ग्रामस्थ, महिला वर्ग उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta