चौगुले कुटुंबियांचा समाजोपयोगी उपक्रम : मान्यवरांची उपस्थिती
निपाणी (वार्ता): एकुलती एक मुलगी प्राची चौगुले हिचा वाढदिवस साजरा करताना तिचा साखरपुडा करून आलेल्या पाहुणे आप्त- स्वकीयांना वाङ् निश्चय करून गुलाबाची विवाहपूर्व रोपे वाटप करण्यात आली. नेमस्त वधू-वरांना वडाच्या झाडाचे पूजन करायला लावून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
येथील नामदेव चौगुले हे लालबहाद्दूर शास्त्री विद्यालय- अर्जुनी शाळेत उपक्रमशील शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी अपूर्वा चौगुले या विद्यामंदिर -निपाणी या शाळेत इंग्रजी विषय शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. समाजोपयोगी कामात त्यांचा नेहमीचा सिंहाला वाटा असतो.
आपल्या मुलीच्या आयुष्यातही पर्यावरण महत्त्वाचे आहे हे ओळखून त्यांनी हा उपक्रम समाजाला दिशा देणारा आदर्शवत उपक्रम राबविला. यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी या उपक्रमात कौतुक केले.
कार्यक्रमास भरत भैरू चव्हाण, डी. एम. गोरे, पी. एम. गोरे, आप्पासाहेब माळी, निवृत्ती घाटगे, मोहन पाटील, किसन, देसाई, मोहन, भोसले, सुनिल पाटील, ललिता पाटील, राजन देसाई, कृष्णात पेडणेकर, बाजीराव चौगुले, प्रतिभा खराडे, पी. एम. पाटील, धनाजी वायदंडे, मधुकर पाटील, संगीत घोरपडे , रावसाहेब जनवाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.