खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकले गावचे ग्रामदैवत भूतनाथ यात्रेला मंगळवारी दि. २० रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रेला प्रारंभ झाला.
सालाबादप्रमाणे यंदाही माळअंकले गावच्या हक्कदारानी भूतनाथ यात्रेला मंगळवारी सकाळी अभिषेक, महापुजेने सुरूवात केली.
गावच्या मानकऱ्यांनी ओटी भरून यात्रेला सुरूवात केली. यावेळी आरती होऊन भूतनाथ देवाची पूजा करण्यात आली
बेळगांव पणजी महामार्गावरील माळ अंकले, झाड अंकले गावचे ग्रामदैवत म्हणून भूतनाथ डोंगरावर आहे. उंच डोंगरावर असलेले भूतनाथ देवस्थान हे निर्सगाचे प्रक्षणिय स्थळ आहे. याठिकाणी बेळगाव खानापूर तालुक्यातील अनेक पर्यटक भूतनाथ डोंगराला भेट देऊन जातात.
भूतनाथ यात्रा दोन दिवस होते. मंगळवारी भूतनाथ डोंगरावर यात्रा भरली जाते. सकाळी डोंगरावर पुजा होऊन दुपारी तीन वाजता महाप्रसादाला सुरवात झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती. सायंकाळी सात वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …