खानापूर : 19 डिसेंबर रोजीचा महामेळावा कर्नाटक सरकारने पोलिसांच्या दडपशाहीने रोखला. या अन्यायाच्या निषेधार्थ मध्यवर्ती म. ए. समितीने सोमवार दि. 26 डिसेंबर रोजी चलो कोल्हापूर नारा दिला आहे. त्या संदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी खानापूर म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक शिवस्मारक येथे शुक्रवार दि. 23 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता बोलाविण्यात आली आहे. तरी तालुक्यातील समितीप्रेमी जनतेने बैठकीला वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर समितीच्या आठ सदस्यीय कमिटीकडून करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta