बेळगाव : टिळकवाडी येथील जीएसएस महाविद्यालयातील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांकरिता दोन दिवसीय संगणक विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य प्रणव पित्रे हे होते. तर अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट चे संगणक विभाग प्रमुख प्रा. सागर बिर्जे हे प्रमुख वक्ते होते. प्रारंभी जीएसएस महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान विभाग प्रमुख प्रा. सोनिया चिट्टी यांनी प्रास्ताविक करून, संगणक विज्ञान कार्यशाळा आयोजनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर कॉलेजचे प्राचार्य प्रणव पित्रे यांनी प्रा. सागर बिर्जे यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना प्राचार्य प्रणव पित्रे यांनी जीएसएस कॉलेजमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली, त्याचबरोबर नवनवीन टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांनी कशा आत्मसात केल्या पाहिजेत याची सखोल माहिती दिली. यावेळी बोलताना प्रा. सागर बिर्जे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये संगणकाचे महत्त्व आगाध असून, संगणकाबद्दल सखोल माहिती करून घेणे आज प्रत्येकाला काळाची गरज बनली आहे. सर्वच क्षेत्रे आज संगणकाने व्यापून गेली आहेत, संगणकाशिवाय कोणतेही क्षेत्र आज अपुरे आहे, तेव्हा भविष्यात सुद्धा संगणकाशिवाय आम्ही राहूच शकणार नाही, संगणक ही आज काळाची गरज बनली आहे. संगणकाच्या माध्यमातून अगाध ज्ञान आपल्याला मिळवीता येते. तेव्हा संगणकाबद्दल माहिती करून घेणे संगणक ऑपरेशन शिकणे हे विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचे आहे, दोन दिवसीय या कार्यशाळेमध्ये प्रा. सागर बिर्जे यांनी विद्यार्थ्यांना संगणकाबद्दल सखोल माहिती दिली. डेटा ट्रान्सफर कसे करावे, प्रोसेसिंग युनिट कसे चालते, त्याचबरोबर संगणक डीव्हाईसीस कोणकोणत्या आहेत त्यांचे कार्य कसे चालते याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना परिपूर्ण अशी माहिती दिली. संगणका च्या आतील भागांची त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती करून दिली, जेणेकरून संगणक वर्क कसे होते, संगणकामध्ये येणाऱ्या अडचणी कोणत्या याही त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. सदर कार्यशाळा दोन दिवस घेण्यात आली. कार्यशाळेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शेवटी संगणक विज्ञानचे प्रा. दत्तात्रय जोशी यांनी आभार मानले.