Sunday , February 9 2025
Breaking News

गुणात्मक होण्यापेक्षा ज्ञानात्मक होणे आज काळाची गरज : साहित्यिका कुमुद शहाकर

Spread the love

 

व्याख्यान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन संपन्न

बेळगाव : जीवनात कीतीही संकटे आली तरी खचून न जाता त्यावर मात करण्यासाठी सामोरे गेले पाहिजे तरच घ्येय निश्चित गाठू शकतो हे आजचा पिढीनी आत्मसात करायला हवे. सखोल ज्ञान मिळवण्यासाठी अवांतर वाचनाची गोडी निर्माण करायला हवी. गुणात्मक होण्यापेक्षा ज्ञानात्मक होणे आज काळाची गरज बनली आहे. स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी जीवनामध्ये नियोजपूर्वक आखणी असायला हवी तरच या महागाईच्या वणव्यात होरपळून न जाता टिकून राहू शकतो. कोरोनाच्या वैश्विक महामारिमध्ये जीवन जगण्याची कला सर्वांनाच समजली आहे सर्वात आरोग्य अतिशय महत्वाचे आहे हे कळले असून त्याप्रमाणे जीवनचलितबद्दल हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे.
बेरोजगारी, महागाई खाजगीकरण, जागतिकीकरण, सामाजिक राजकीय सांस्कृतिक साहित्य कला क्रीडा नाट्य राजकारण यामध्ये दिवसेंदिवस होत जाणारे बदल हे माणसाच्या जीवनावर परिणाम करत आहेत. युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धामुळे जागतिक परिणाम झाला त्यामुळे जनजीवन महागाईच्या झळा सुद्धा पाहायला मिळाल्या. शिक्षण यामधील चालणारे बाजारीकरण आणि गरिबांची होणारी होरपळ या व्यवस्थेमध्ये दिसून येते. भारत देशातील अनेक महामानव विचारवंत साहित्यिक नेतेमंडळी संत महापुरुष यांनी दिलेले योगदान आपण कधीही विसरू शकत नाही याचे भान प्रत्येक व्यक्तीने ठेवायला हवे तरच हा समाज सक्षम आणि सुदृढ राहू शकतो त्यांचे विचार या महामानवांचे विचार प्रत्येकाने अंगीकारणे अत्यंत आवश्यकता आहे. लातूर विचारवंतांचे विचार आपल्या जीवनाला वेगळी दिशा देऊन एक यशस्वी तिच्या वाटचाल करण्यासाठी नेहमीच प्रेरणा देतात त्यांचा आदर्श आपला जीवनात उतरव अत्यंत महत्त्वाचे आहे. माणसाने समाजाचे भान ठेवून कार्य करण्याची गरज वेळोवेळी ठेवायला हवी. समाजाचे आपण देणे लागते हे लक्षात ठेवून समाज समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपण पुढाकार घेण्यात अत्यंत गरजेचे आहे. प्रमुख वक्त्या म्हणून राष्ट्रीय सचिव साहित्यिका कुमुद शहाकार ( मुंबई ) यांचे “आजच्या काळातील जीवनशैली : सामाजिक योगदानाचे महत्व आणि आरोग्य ही खरी संपत्ती एक चिंतन” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आगाशी विरार अर्नाळा शिक्षणसंस्था सेवक संघ व पर्यावरण उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था भारत, अखिल भारतीय सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगांव आणि माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार दिनांक 21/ 12 /2022 रोजी नरसिंह गोविंदराव वर्तक हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी ऑनलाइन आणि ऑफलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच तसेच प्रत्यक्ष विविध आजारांवर आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. विकास वर्तक साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीहा व्याख्यान, शिबिराचा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरप्रेमींनी रोपट्याला पाणी घालून केली. व्यासपिठावर याप्रसंगी आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्था अध्यक्ष श्री. राजेंद्र पारधी सर व पर्यावरण उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था भारत संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय चोघळा सर व प्रमुख वक्त्या म्हणून मुंबईतील साहित्यिका राष्ट्रीय सचिव कुमुद शहाकार मॅडम, संगीता भेरे मॅडम राज्य
संघटक मा नगरसेविका किशोर भेरे , अभय पिंपळे, एन जी वर्तक हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती सारिका रावत मॅडम, उदय पाटील, अनिल पाटील, ए. व्ही. सुतार, उपमुख्याध्यापिका संगीता डिसिल्वा मॅडम, अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर विरार शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती संगीता राऊत मॅडम, वपर्यवेक्षिका श्रीमती श्वेता ठाकूर, श्रीमती सविता वाळिंजकर, श्रीमती ज्योत्सना नाईक व तज्ञ डॉक्टर व वैद्यकीयअधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

या शिबिराचा लाभ 590 नागरिकांनी ग्रामस्थ व सेवकांनी घेतला. यावेळी आपल्या सेवक संघाचे सभासद श्री. किरण जाधव सर, श्री. दत्तात्रय ढेरे सर, श्री. गणेश दुमाडा सर, सौ. भक्ती राऊत मॅडम, अर्चिता पिंपळे मॅडम, सौ. स्वरा चोरगे मॅडम, सौ. रुपाली पाटील मॅडम, श्री. हेमंत घरत सर, श्री. कुणाल वझे सर या सर्व सभासदांनी सकाळी नऊ वाजले पासून आरोग्य तपासणीसाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णासाहेब वर्तक शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. किरण जाधव सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार अण्णासाहेब वर्तक शाळेच्या शिक्षिका सौ. भक्ती राऊत मॅडम यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

श्री समादेवी जन्मोत्सव सोहळा- श्री देवीदरबाराला उत्साहात प्रारंभ

Spread the love  बेळगाव : वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *