Wednesday , March 4 2026
Breaking News

तोपिनकट्टी संचालित शांतिनिकेतन स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा गुरूवारी दि. ५ रोजी शाळेच्या पटांगणावर मोठ्या उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक व लैला सुगर्सचे चेअरमन, भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर होते.
तर व्यासपीठावर शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे चेअरमन प्रा. भरत तोपिनकट्टी, सचिव आर. एस. पाटील, संचालक महादेव बांदिवडेकर, विठ्ठल करंबेळकर, चांगाप्पा निलजकर, यल्लापा तिरवीर, बाळाराम पाखरे, राजाराम हलगेकर, बाळ गौडा पाटील, प्राचार्या स्वाती कमल वाळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मुलीच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्राचार्या स्वाती कमल वाळवे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी वर्षभरात विविध क्षेत्रात, खेळात यश मिळविलेल्या विजेत्यांना पाहुण्याच्याहस्ते बक्षिस देऊन गौरवण्यात आले.
शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा आदर्श विद्यार्थी म्हणून आकाश कंग्राळकर तर आदर्श विद्यार्थीनी म्हणून वैष्णवी देसाई हीची निवड करण्यात आली. व पाहुण्याच्याहस्ते त्याना प्रमाणपत्र, मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी चेअरमन प्रा. भरत तोपिनकट्टी, सचिव प्रा. आर. एस. पाटील व उपस्थित मान्यवराची विद्यार्थ्याचे गौरव करणारी भाषणे झाली.
शेवटी अध्यक्षीय भाषणात श्री महालक्ष्मी ग्रुप चे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, गेली १२ वर्षे शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात होत होते. मात्र गेली दोन वर्षे कोरोना काळात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात होऊ शकला नाही. यंदा शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे तपपुर्ती वर्षे म्हणजे १२ वर्ष यामुळे यंदाचा स्नेहसंमेलन सोहळा दिमाखात साजर करण्यात येत आहे.

त्याचबरोबर संस्थापक विठ्ठलराव हलगेकर यांनाही ६० वर्षे पूर्ण होऊन ६१ व्या वर्षी पदार्पण केले. त्यातच शिक्षकी सेवानिवृत्ती या संगम आल्याने याचे औचित्य साधून येत्या दि. ७ ते दि १० जानेवारीपर्यंत शिवगर्जना हा महानाट्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित इतिहास तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे याचा लाभ खानापूर तालुक्यातील जनतेने घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यानी केले.
शेवटी शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बहारदार असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
यावेळी जवळपास १० हजार नागरीक उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *