खानापूर (प्रतिनिधी) : अबनाळीत (ता. खानापूर) येथे माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यानी मंजूर केलेल्या मुख्यमंत्री विषेश अनुदान अंतर्गत ५०, ५४ या योजनेअंतर्गत मंजुर असलेल्या एक किलो मीटर अंतराच्या रस्त्यासाठी १० लाख रूपये खर्चून सीसीरोड कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
यावेळी बेळगांव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्याहस्ते भुमी पुजन करून व कुदळ मारून सीसीरोड कामाचा शुभारंभ करण्यात आला. तर खानापूर तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांनी श्रीफळ वाढविले.
यावेळी बोलताना बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की, खानापूर तालुक्यातील अबनाळी सारख्या अतिमागासलेल्या व जंगल भागात रस्त्याची परिस्थिती कठीण आहे. यासाठी माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी मुख्यमंत्री विषेश अनुदान या सीसीरोडसाठी अनुदान मंजूर करून दिले.
त्यामुळे अबनाळी गावची समस्या दूर झाली. अशीच विकास कामे यापुढे करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमाला भाजप युवा नेते पंडित ओगले, माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई, भाजपा शहर अध्यक्ष सुनिल नायक, प्रकाश निलजकर, ग्राम पंचायत सदस्य दिपक गवाणकर, श्रीपाद शिवलकर तसेच अबनाळी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta