खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-बेळगाव या मूळ परिसरातील पण सध्या रायकर माळा, धायरीगाव पुणे या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक हेतूने “बेळगावकर एकता ग्रुप” या संघटनेची स्थापना केली.
या ठिकाणी खानापूर-बेळगाव व तत्सम परिसरातील साधारण ५० कुटुंब आहेत. अनेक विधायक कार्यासाठी आणि सणोत्सव साजरे करण्यासाठी ही मंडळी एकत्र येत असतात. भविष्यातही विविध विकासात्मक कामे आणि सामाजिक उपक्रम राबविण्याच्या द्रुष्टीने अधिक सोयीचे व्हावे म्हणून रीतसर संघटनेचे संचालक मंडळ नेमण्यात आले.
या संघटनेच्या अध्यक्षपदी परशराम निलजकर यांची निवड करण्यात आली आहे.
तर उपाध्यक्षपदी सुधीर शिवणगेकर, कार्याध्यक्षपदी प्रकाश नाळकर, सचिवपदी सचिन नांदोडकर, सह-सचिवपदी प्रभाकर जांबोटकर, खजिनदारपदी संभाजी लोटुलकर तर सह-खजिनदारपदी नारायण फटाण यांची निवड करण्यात आली. बुधवार दि. ४ रोजी रायकर माळा धायरीगाव या ठिकाणी उद्घाटनपर कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी पीटर डिसोझा, शिवाजी जळगेकर, कृष्णा निलजकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परशराम निलजकर होते. प्रभाकर जांबोटकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले तर प्रकाश नाळकर यांनी आभारप्रदर्शन केले. हरीश पाटील आणि सचिन नांदोडकर यांनी सूत्रसंचालन केले.
उमेश निलजकर, राजाराम करंदोळकर, राजाराम नांदोडकर, सतीश रूपण, मर्याप्पा पाटील, संजय नांदोडकर, प्रकाश पाटील, निंगाप्पा पाटील, दिपक गावडे, मंजूनाथ देसाई, विठ्ठल तिनैकर, गणेश गुरव, महाबळेश्वर पाटील, अनंत काकतकर, किसन पेडणेकर, इराप्पा पाटील, संदीप देवगेकर यांच्या सहकार्याने बेळगाकर एकता ग्रुप स्थापन करण्यात आले. ह्या कार्यक्रमासाठी या भागातील सर्व महिला, कामगार वर्ग आणि लहान मुलांना भाग घेतला होता.