खानापूर : जटगे ता खानापूर येथे रविवार दि. 22-1- 2023 रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धा होणार असून त्याकरिता जटगे परिसरातील कामतगे, शिंपेवाडी, भालके के एच भटवाडा, आदी शाळांना भेट देऊन तेथील एसडीएमसी कमिटी, नागरी अभियान कार्यकर्ता, महिला वर्ग यांना खेळाचे महत्व व मॅरेथॉन ला सहभागी होणे, याविषयी सविस्तर माहिती सांगून विश्वभारती कला क्रीडा संघाचे लोंढा भाग कार्याध्यक्ष कृष्णा खांडेकर व महिला प्रमुख सौ. रामाक्का हणबर हे सर्वत्र जोरदार जनजागृती करत आहेत, त्याचबरोबर त्यांनी प्राथमिक शाळेच्या पटांगणाचीही पाहणी केली आहे, त्याबद्दल विश्व भारती कला क्रिडा संघटना बेळगाव यांच्याकडून त्या कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta