
खानापूर : महिलांना रोजच्या व्यावहारिक जीवनातून थोडा निवांतपणा मिळावा, विचारांची देवाणघेवाण करता यावी यासाठी हळदीकुंकूच्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात. त्यासाठी हळदीकुंकूसारखे कार्यक्रम करणे गरजेचे आहे, असे भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या.
नियती फौंडेशच्या वतीने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून इटगी येथे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नियती फौंडेशनच्या अध्यक्षा व खानापूर भाजपा महिला मोर्चा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत यांनी हळदीकुंकूचे महत्व पटवून दिले व महिला संघटन अधिक मजबूत करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामीण भाजपा सचिव चंद्रकांत कोलकार, प्रशांत सानिकोप, बालेश चव्हाणवार, नागेश रामजी, अनिता कोमस्कर, गंगूताई तलवार, काव्या तलवार यांच्यासह इटगी गावातील महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta