खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ खानापूर तालुक्याच्या वतीने गुरूवंदना समारंभ कार्यक्रमाच्यावतीने शनिवारी निवृत्त शिक्षक, जिल्हा आदर्श शिक्षक, विविध संघटना च्यावतीने आदर्श पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा सत्कार पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे अध्यक्ष वाय एम पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका नोकर संघाचे अध्यक्ष बी एम येळ्ळूर, बीईओ लक्ष्मणराव यंकूडी, संघाचे सचिव एम आर चवलगी, संचालक आय जे बेपारी, आय सी सनदी, ए आर बाळगप्पणावर, पी, जी पाखरे, सतीश हळदणकर, टी बी मोरे, भोमाी कांबळे, सौ. ए बी देसाई, सौ. एन जी देसाई, सौ. अर्चना पाटील, सौ. रामेश्वरी पाटील, श्रीमती मिरा पाटील आदी संचालक उपस्थित होते.
प्रास्ताविक बी ए येळ्ळूर यांनी केले. तर उपस्थितांचे स्वागत एम आर चवलगी यांनी केले.
यावेळी दीपप्रज्वलन बीईओ लक्ष्मणराव यंकूडी तर फोटो पुजन अध्यक्ष वाय एम पाटील यांनी केले.
यावेळी बोलताना अध्यक्ष वाय एम पाटील कोरोनाच्या महामारीमुळे निवृत्त शिक्षक सन्मान करणे अडचणीचे होत होते. मात्र निवृत्तीच्या उंबरड्यावर राहून शिक्षकाना पुष्प देऊन त्यांचा सन्मान करणे राहिले तर त्याच्या ४० वर्षाच्या शिक्षकी सेवेचे रूण तसेच राहणार हा विचार शिक्षक संघटने केला. व शेवटच्या घटकेला सत्कार करण्याचा निर्णय घेतला व आज गुरुबंधूचा सन्मान पार पडला.
यावेळी तालुक्यातील प्राथमिक शाळेतुन निवृत्त झालेल्या शिक्षकांचा सत्कार उपस्थित पाहुण्याच्याहस्ते शाल, श्रीफळ, मान चिन्ह व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जिल्हा आदर्श पुरस्कार, विविध क्षेत्रातुन आदर्श पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा ही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन केएसपीएसटीए खानापूर घटकची व्हेबसाईट बीईओ लक्ष्मणराव यंकूडी यांच्याहस्ते सुरू करण्यात आले. यामुळे शिक्षक वर्गाची अडचण दुर होणार आहे.
यावेळी बीईओ लक्ष्मणराव यंकूडी, एम व्ही पाटील, श्री बागवान, श्रीमती शबाना अण्णेगीरी, मुख्याध्यापक एस टी पाटील, आदीची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पिराजी पाखरे यानी केले. तर आभार सौ. अंजना देसाई याना मानले.
कार्यक्रमाला तालुक्यातील प्राथमिक शाळेेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …