खानापूर (प्रतिनिधी) : गुंजी (ता. खानापूर) सीआरसी केंद्रातील सर्व शाळांच्या वतीने इयत्ता चौथी ते नववी इयत्तेतील विद्यार्थ्याकरिता कलिका चेतरीकेचा एक भाग असलेला कार्यक्रम म्हणून कलिका हब्ब कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी गुंजी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा गुंजी येथे बुधवारी करण्यात आले.
प्रारंभी गावातून दिंडी पालखी फिरवण्यात आली. त्याचबरोबर झांज पथक, लेझीम, संत महाराजांच्या अभंगाने व टाळाच्या गजराने गाव दुमदुमून गेला होता. विविध शाळातून आलेल्या मुलांनी विविध वेशभूषा केलेले होते. अशी जल्लोषात मिरवणूक शाळेच्या गेट जवळ आल्यावर बीआरसी कार्यालयाचे समुह संपन्न मुल्य अधिकारी ए. आर. अंबगी व अक्षरदासोह अधिकारी महेश परीट यांच्या हस्ते त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित व शिक्षण प्रेमी नागरिक दीपक देसाई यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष तानाजी गोरल होते.
यावेळी प्रास्ताविक सरकारी हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. एन. उत्तुरकर यांनी केले. तर मराठी शाळेचे मुख्याध्यापक आर. ए. मधाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी दीपप्रज्वलन व फोटो पुजन उपस्थित पाहुण्याच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी अनेक मुलांनी केलेल्या कागदी टोप्या व कागदी फुले देऊन स्वागत करण्यात आले
यावेळी उपस्थित पाहुण्याची भाषणे झाली.
यावेळी बोलताना समुह संपन्न मुल्य अधिकारी ए. आर. अंबगी म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे विद्यार्थ्याच्या अभ्यासात कमतरता आली. ही कमतरता भरून काढण्यासाठी कलिका हब्बचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला अनेक कला गुणाना वाव मिळणार आहे,
असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला सीआरपी बी. ए. देसाई, विविध शाळाचे मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग विद्यार्थी वर्ग, एसडीएमसी सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. बी. चापगावकर यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta