माजी आमदार दिगंबरराव पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने
खानापूर : सीमावासीयांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू, सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी दिली.
दिगंबरराव पाटील यांच्या 68 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांशी ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अधुरे असताना वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणे देखील असंयुक्तिक वाटते. हुतात्म्यांचे बलिदार व्यर्थ जाऊ नये यासाठी चळवळीला अजून धार आली पाहिजे. रस्त्यावरचा लढा तीव्र करायचा असेल तर तरुण पिढीने समितीच्या मुख्य प्रवाहात येणे गरजेचे आहे. समितीची धुरा तरुण पिढीने स्वतःच्या खांद्यावर घ्यावी.
यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, सचिव सीताराम बेडरे, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, रुक्माना झुंजवाडकर, नारायण कापोलकर, ईश्वर बोबाटे, ब्रम्हानंद पाटील, रमेश धाबाले आदी मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta