खानापूर : मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या वतीने हुबळी येथे आयोजित २६ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात दोन विद्यार्थ्यानी सहभाग दर्शविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पाडलेल्या या कार्यक्रमात युवा पिढीला उद्देशून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात संपूर्ण भारतभरातून ‘राष्ट्रीय सेवा योजना’ चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मराठा मंडळ महाविद्यालयाच्या वतीने कु. दीप्ती याडवे व कु. धिरज कामतगेकर या दोन छात्रांनी सहभाग दर्शविला.
हा कार्यक्रम हुबळी- धारवाड येथे १२ जानेवारी ते १६ जानेवारी २०२३ या दरम्यान चालला. या सहभागी विद्यार्थ्यांना मराठा मंडळ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जे. के. बागेवाडी तसेच आय.क्यू. एस. सी. अधिकारी प्रा. व्ही. एम. तीर्लापूर तसेच एन. एस. एस. विभागाचे अधिकारी प्रा. वाय. एस. धबाली यांनी मार्गदर्शन केले. सहभागी मुलांना राष्ट्रीय युवाउत्सवामध्ये सहभागी झाल्याबद्दल महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्गाने शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta