खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील वाजपेयी नगरातील विविध समस्यांचे गाऱ्हाणे निवेदनाद्वारे भाजप नेते आनंदराव पाटील यांनी बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कार्जोळ, खासदार मंगला अंगडी व रयत मोर्चा राज्याध्यक्ष इराणा कडाडी आदींना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, खानापूर शहरातील नवीन वसाहतीत वाजपेयी नगर उभारण्यात आले आहे. या वाजपेयी कोणत्याच सोयी सवलती नाही. यामध्ये रस्ते, गटारी, पाण्याच्या टाकी, आदीची अत्यंत गरज आहे. येत्या पावसाळ्याच्या आत राज्य व केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून वाजपेयी नगरच्या समस्या सोडवा, अशी मागणी भाजप नेते आनंदराव पाटील यांनी केली.
यावेळी बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कार्जोळ यांनी निवेदनाचा स्विकार करून समस्या सोडवू असे आश्वासन दिले.
यामुळे वाजपेयी नगरातील नागरिकांच्या समस्याना वाचा फोडल्याने नागरिकांतून समाधान पसरले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta