Wednesday , April 22 2026
Breaking News

खानापूर वाजपेयी नगरच्या समस्यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील वाजपेयी नगरातील विविध समस्यांचे गाऱ्हाणे निवेदनाद्वारे भाजप नेते आनंदराव पाटील यांनी बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कार्जोळ, खासदार मंगला अंगडी व रयत मोर्चा राज्याध्यक्ष इराणा कडाडी आदींना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, खानापूर शहरातील नवीन वसाहतीत वाजपेयी नगर उभारण्यात आले आहे. या वाजपेयी कोणत्याच सोयी सवलती नाही. यामध्ये रस्ते, गटारी, पाण्याच्या टाकी, आदीची अत्यंत गरज आहे. येत्या पावसाळ्याच्या आत राज्य व केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून वाजपेयी नगरच्या समस्या सोडवा, अशी मागणी भाजप नेते आनंदराव पाटील यांनी केली.
यावेळी बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कार्जोळ यांनी निवेदनाचा स्विकार करून समस्या सोडवू असे आश्वासन दिले.
यामुळे वाजपेयी नगरातील नागरिकांच्या समस्याना वाचा फोडल्याने नागरिकांतून समाधान पसरले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री नागेश महारुद्र मंदिर कळसाची शोभायात्रा 20 एप्रिल रोजी

Spread the love  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य व थळदैवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *