
खानापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 28 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता एम. के. हुबळी येथे विजय संकल्प यात्रेसाठी उपस्थित राहणार आहेत. खानापूर, कित्तूर, बैलहोंगल आदी भागातून बहुसंख्य नागरिकांनी अमित शहा यांच्या जाहीर सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले आहे.
लोंढा येथे गणेश जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी भाजपा नेते बाबुराव देसाई, अनंत पाटील, विद्या भूतकी तसेच भाजपा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta