खानापूर (प्रतिनिधी) : निडगल (ता. खानापूर) येथील कै. आनंदीबाई तोपिनकट्टी यांच्या स्मरणार्थ त्याचे चिरंजीव व जीएसएस काॅलेजचे प्रा. भरत तोपिनकट्टी यांनी मराठी हायर प्राथमिक शाळा, निडगल येथे वार्षिक शैक्षणिक स्पर्धा पारितोषिक समारंभ 26 जानेवारी रोजी पार पडला. शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास व्हावा यासाठी वर्षभर पाहिली ते सातवीच्या प्रत्येक वर्गासाठी प्रत्येक शनिवारी वाचन, चित्रकला, कागदी वस्तू निर्माण, माती हस्तकला, भाषण, हस्ताक्षर आदी स्पर्धा आयोजिल्या जातात. वर्षभर चांगली हजेरी व स्वच्छ राहण्याची सुद्धा स्पर्धा आयोजिली जाते. या सर्व स्पर्धाची बक्षीसे प्रा. भरत तोपिनकट्टी आपल्या मातोश्री कै. आनंदीबाई यांच्या स्मरणार्थ दरवर्षी प्रायोजित करतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी लिहिण्यासाठी पॅड, वह्या, पेन्सिल बॉक्स, स्केच पेन बॉक्स, पाण्याची बॉटल, रंग पेटी व इतर शालोपयोगी वस्तू रुपात एकूण १४७ पारितोषिकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक दशरथ कुंभार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गावातील ज्येष्ठ नागरिक व निवृत्त मुख्याध्यापक महादेव कदम हे अध्यक्ष स्थानी होते.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, शाळा सुधारणा समितीचे सर्व सदस्य, नागेश चोपडे, शांताराम कदम व निडगल गावातील नागरिक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. शाळेतील शिक्षका श्रीमती गुरव यांनी सूत्रसंचालन केले. श्री. खांबले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta