खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीवर नेहमीच आमवश्या पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवारी भाविक मलप्रभा नदीवर स्नानासाठी जातात.
आज शुक्रवार असल्याने अशोक नगर (ता. खानापूर) येथील युवक सुनील चंद्राप्पा तलवार (वय ३२) हा आपल्या कुटुंबासमवेत मलप्रभा नदीवर आला होता. तो दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तो स्नानासाठी मलप्रभा नदीत उतरला. त्याला पाण्याचा अंदाज नसल्याने बघता बघता तो पाण्यात बुडूत असतानाच जवळ असलेल्या नागरिकांनी जवळ असलेल्या पाईप सहाय्याने वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र सुनिलने बुडताना पाईपचा आधार घेतला नाही. त्यातच तो घाबरल्याने बुडाला. बघता बघता मलप्रभा नदी घाटावर एकच गर्दी झाली. लागलीच खानापूर पोलिस स्थानकाला तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले.
यावेळी खानापूर पोलिस स्थानकाचे पीएसआय प्रकाश राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मलप्रभा नदीच्या प्रवाहात मृत्यूदेहाचा शोध घेण्याचे काम उशीरापर्यंत चालु आहे. घटनास्थळी अशोक नगरच्या तलवार कुटूंबाचा आक्रोश चालु होता.
Belgaum Varta Belgaum Varta