खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या ठिकाणी जांबोटी क्राॅसजवळ माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांच्या काळात क्रिडांगणाचा प्रस्ताव होऊन क्रिडांगण उभारण्यात आले. त्यांच्या काळात मलप्रभा क्रिडांगणाचा विकास झाला. त्यानंतर मलप्रभा क्रिडांगणाच्या विकासाचा पत्ताच नाही.
आजतागायत विकास नसलेल्या क्रिडांगणावर स्पर्धा भरविल्या जातात. अनेक नेत्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. मात्र विकासाकडे कुणाचेच लक्ष नाही
तालुक्यासह खानापूर शहरात एकच क्रिडांगण म्हणजे मलप्रभा क्रिडांगण होय. मात्र या क्रिडांगणावर कोणतीच सोय नाही.
सध्या या क्रिडांगणावर कंपाऊंड भिंत नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, मुतारी, शौचालय नाही. दिव्याची सोय नाही. याचबरोबर कोणत्याची खेळाच्या मांडणी नाही. धावपट्ट्या नाहीत. त्यामुळे या मलप्रभा क्रिडांगणावर खेळाचा सराव करण्यासाठी सोय नसल्याने खेळांडुमधुन कमालीची नाराजी पसरली आहे. काही वर्षापूर्वी दोन कोटीचा निधी मंजूर झाला होता अशी चर्चा खानापूर शहरातील क्रिडाप्रेमीतून होत होत नाही. मात्र मलप्रभा क्रिडांगणासाठी कोणताच निधी वापरला गेला नाही. त्यामुळे मलप्रभा क्रिडांगणावर स्पर्धा भरविणे गैरसोयीचे झाले आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यासह खानापूर शहरातील क्रिडाप्रेमीतून नाराजीचे सावट पसरले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta