Monday , September 21 2026
Breaking News

कौंदलच्या काॅलेज विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : अलिकडे काॅलेज विद्यार्थी अनेक मानसिक तणावाखाली वावरत आहेत. अशाच प्रकारे कौंदल (ता. खानापूर) येथील काॅलेज विद्यार्थी महादेव सुभाष कोलेकर (वय १७) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि. ४ रोजी घडली.
सदर विद्यार्थ्याच्या घरचे लोक शेताकडे गेले होते. घरी कोणी नसल्याचे पाहून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी उशीरा लक्षात आली.
सदर विद्यार्थी नंदगड येथील महात्मा गांधी पदवीपूर्व काॅलेजमध्ये १२ वीच्या वर्गात शिकत होता. घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल घेऊन पंचनामा केला. लागलीच खानापूर येथील सरकारी दवाखान्यात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असुन रात्री उशीरा कौंदल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर विद्यार्थ्याच्या आत्महत्या मागचे नेमके कारण अद्याप कळले नाही. खानापूर पोलिस पुढील तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *