खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या दिवसापूर्वीच कौंदलच्या काॅलेजच्या विद्यार्थ्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी ताजी असतानाच पुन्हा सोमवारी दि. ६ रोजी शिवठाण (ता. खानापूर) येथील ज्ञानेश्वर धाकलू शिरोडकर (वय २३) याने समोरी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
शिवठाण येथील युवक सैन्यात भरती होण्यासाठी नंदगड येथील सैनिक अकेडमिशियन प्रशिक्षण घेत होता. तर त्याने सैनिक भरतीमध्ये भाग घेतला होता. लेखी परीक्षा ही दिली होती. परंतु लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने निराश होऊन त्याने आत्महत्या चे टोकाचे पाऊल उचलल्या ने शिवठाण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या पाठोपाठ दोन घटना घडल्याने पालक वर्गात भितीचे वितरण पसरले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta