खानापूर (प्रतिनिधी) : जटगे (ता. खानापूर) येथील ग्रामस्थांच्यावतीने नव्याने उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिरात हनुमान मुर्तीची प्रतिष्ठान होणार आहे.
या निमित्ताने नुतन हनुमान मुर्तीचे स्वागत भव्य मिरवणूक काढून करण्यात आले.
प्रारंभी चापगांवातुन हनुमान मुर्तीच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. गावातून हनुमान मुर्तीला सुवासिनीनी आरती ओवाळून स्वागत केले. नुतन हनुमान मुर्ती ट्रक्टरमध्ये सजावट करून टाळमृदंगाच्या नादात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी हनुमान मुर्तीच्या मिरवणुकीला उत्साहात प्रतिसाद दिला होता.
यावेळी जटगे गावाच्या हनुमान मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष महाबळेश्वर पाटील, अध्यक्ष यादव पाटील, ग्राम पंचायतीचे सदस्य सागर पाटील, पुंडलिक पाटील, पांडुरंग कडोलकर, कल्लापा मळिक, शंकर मळिक, बाळू पाटील, वामन लोटूलकर, सिध्दू हलशीकर, गजानन पाटील, ईश्वर पाटील, महादेव गणपतराव पाटील, याचबरोबर श्री कलमेश्वर भजनी मंडळ, पंच मंडळी, गावकरी, युवा वर्ग तसेच महेश मळीक साऊंड सिस्टीम व सहदेव पेडणेकर साऊंड सिस्टीम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta