खानापूर : विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून इच्छुकांचे अर्ज सादर करण्यासाठी आवाहन केले आहे. यानुसार आज खानापूर विधानसभा मतदारसंघातून खानापूर मध्यवर्ती विकास बँकेचे मुरलीधर पाटील यांनी उमेदवारीसाठी अर्ज समितीकडे सादर केला आहे.
अर्जदारांकडून ५१ हजार रुपये देणगीदाखल घेऊन म. ए. समिती अर्ज स्वीकारत आहे. यानुसार आज मुरलीधर पाटील यांनी खानापूर म. ए. समितीचे सचिव विलास बेडरे यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला आहे.
यावेळी खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, सचिव सिताराम बेडरे, खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष सुभाष चलवादी, मल्लिकार्जुन मुतगी, विष्णू बेळगावकर, रमेश पारसेकर, भू विकास बँकेचे व्हा. चेअरमन विरुपाक्ष पाटील, नारायण पाटील, सुरेश गावकर, कुतुबुद्दीन बिच्चन्नवर, विठ्ठल कुंभार, ज्योतिर्लिंग पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर पाटील, नागेश पाटील, मुरलीधर गुरव, मारुती पाटील, अशोक पाटील, मल्हारी तोपिनकट्टी, मनोहर नंदाळकर, नारायण विष्णू पाटील, प्रेमानंद पाटील, इराप्पा पाटील, हुवाप्पा पाटील, शामराव पाटील, विठ्ठल ठाकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta