Monday , December 8 2025
Breaking News

खानापूरात भाजपच्या ए. दिलीप कुमार यांच्याकडून जनतेच्या भेटीगाठी

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरात येत्या २०२३ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक झाले आहेत. अशातच भाजपमधून आणखी एक इच्छुक असल्याचे समजते.

भाजपचे ए. दिलीपकुमार यांनी शनिवारी खानापूर शहरात आगमन केले. जांबोटी क्राॅस पासून शिवस्मारकापर्यंत शहरातील दुकानदाराच्या भेटी घेऊन त्यांना घड्याळ्यांचे वितरण करत संपर्क साधला.
प्रारंभी शिवस्मारक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन केले. त्यानंतर संपूर्ण खानापूर शहरातील नागरिकांना घडाळ्याचे वितरण केले.
यावेळी त्यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविली. सोबत ए. दिलीपकुमार यांचे समर्थक, कार्यकर्ते, महिला वर्ग उपस्थित होता.
खानापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नेते विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, धनश्री सरदेसाई, जोतीबा रेमाणी, सुरेश देसाई, डॉ. सोनाली सरनोबत, बाबूराव देसाई, आदीनी मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवाराच्या पाठीशी एकसंघ राहू अशी शपथ घेतली आहे.
आता नव्याने खानापूरात दाखल झालेल्या भाजपच्या ए. दिलीपकुमार यांच्याबाबत तालुका भाजपचे अध्यक्ष काय बोलणार याकडे खानापूर तालुक्यातील भाजपच्या नेते मंडळी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *