खानापूर : गोवा बोरी येथे 5 फेब्रुवारी 2023 रोजी प्रथम श्री. कल्लाप्पा तिरवीर मौजे तोपिनकट्टी यांनी माऊंटेशन रन 15 किलोमीटर पन्नास वर्षावरील गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला
महाराष्ट्र पंढरपूर येथे 5 फेब्रुवारी रोजी कुमार वेदांत होसुरकर तोपिनकट्टी पाच किलोमीटर मॅरेथॉन मध्ये 14 वर्षाखाली द्वितीय क्रमांक मिळविला माघ वारी निमित्त या स्पर्धा संपन्न झाल्या
श्री. कल्लाप्पा मल्लाप्पा तीरवीर व कुमार वेदांत रामा होसुरकर हे तोपिनकट्टी गावचे सुपुत्र आहेत यांचे शिक्षण प्राथमिक व माध्यमिक तोपिनकट्टी गावामध्ये झाले आहे.
श्री. तीरवीर हे आज कोल्हापूर येथे स्वतःच्या व्यवसायानिमित्त राहतात व्यवसायात उत्तम प्रगती साधून आपले ध्येय गाठण्यास सातत्याने दररोज 15 किलोमीटर रनिंग सराव करतात याना श्रीयुत अशोक पाटील पी ई शिक्षक व प्रशिक्षक गर्लगुंजी आणि ज्येष्ठ प्रशिक्षक श्री. एल. जी. कोलेकर, गर्लगुंजी श्री. सुभाष पवार कोल्हापूर आंतरराष्ट्रीय कोच यांचे मार्गदर्शन आणि वडील बंधूश्री यल्लाप्पा तिरवीर संचालक श्रीमहालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टी व खानापूर क्रीडा संकुलचे प्रमुख श्री. एल. डी. पाटील गर्लगुंजी माजी मुख्याध्यापक आणि ग्रुप खानापूर तालुक्यातील संघ संस्था क्रीडा प्रेमी यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभत आहे.
कुमार वेदांत होसुरकर हा सरकारी कन्नड शाळा दौलती तालुका खानापूर इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे. मुख्याध्यापक व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. आई वडील दैनंदिन सराव घेतात वडील तोपिनकट्टी हायस्कूलमध्ये पी ई शिक्षक म्हणून काम करतात.
Belgaum Varta Belgaum Varta