
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अनेक गावच्या शिवारात आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत.
मंगळवारी असोगा येथे ऊसाच्या फडाला आग लागून दोन लाखाचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गुरूवारी होनकल गावाजवळील तीन एकर जमिनीतील काजूच्या बागेला आग लागल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. या घटना ताज्या असतानाच इदलहोंड (ता. खानापूर) येथील संजय चांगाप्पा जाधव यांच्या शेतातील वीटभट्टी मजूर कामगाराच्या चार झोपड्याना शुक्रवारी दि. १७ रोजी सकाळी अचानक आग लागल्याने लाखोचे नुकसान झाले आहे.
सध्या इदलहोंड परीसरातील शिवारात वीट व्यवसायाला जोर सुरू आहे. अनेक भागातून वीटभट्टी मजूर शिवारात झोपड्या घालुन व्यास्तव्यास आहेत.
शुक्रवारी सकाळी या झोपडपट्टीतील कामगार वीटभट्टीवर कामाला गेले असताना एका झोपडीला अचानक आग लागली. बघता बघता आगीने झोपडीला चार बाजुन घेरले त्यामुळे जवळ लागुन असलेल्या झोपड्यानीही पेट घेतला जवळ जवळ चार झोपड्याना आगीने पेट घेतला. वीटभट्टीवर कामावर गेलेल्या मंजुरानी पाहताच आग विझविण्यासाठी टॅकरने पाणी मारले. जवळच असलेल्या विद्युत पंप सेटने पाणी मारून आग आटोक्यात आणली अन्यथा आणखीन झोपड्या आगीत भस्मसात झाल्या असता. वीटभट्टी मजूर कामानिमित्त झोपड्या बाहेर होते. जनावरेही बाहेर होती. त्यामुळे जीवीतहानी झाली नाही.
झोपड्याना आग लागल्याने झोपड्यामध्ये असलेले आठ मोबाईल, कपडे, धान्य, संसार उपयोगी साहित्य रोख रक्कम आगीत जळून खाक झाले.
त्यामुळे वीटभट्टी मजूर कामगारांचे लाखोचे नुकसान झाले.
यावेळी गावातील नागरिकांनी येऊन मदत केली.
संबंधित भागाच्या तलाठ्यानी भेट देऊन पंचनामा करून वीटभट्टी मजूर कामगारांना आर्थिक मदत देऊ करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांतुन होत आहे.
घटनास्थळी इदलहोंड ग्राम पंचायतीचे माजी सदस्य कृष्णा कुंभार यांनी भेट दिली. वीटभट्टी मजूर कामगारांना धीर दिला.
Belgaum Varta Belgaum Varta