Wednesday , March 4 2026
Breaking News

निलावडे येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून काजू, चिकूची झाडे भस्मसात

Spread the love

 

निलावडे (तानाजी गोरल) : खानापूर तालुक्यात गेल्या आठवड्याभरात आगीचा वनवा पडण्याचे प्रकार अधिक प्रमाणात वाढले आहेत. दररोज एक-दोन ठिकाणी आग लागून शेतवडी साहित्याचे नुकसान होत आहे. आज शनिवारी देखील खानापूर तालुक्यातील निलावडे येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून शेतवडीतील काजू, चिकूची झाडे तसेच गवतगंजीसह शेतीचे बरेसे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने जवळपास दोन ते तीन ट्रॅक्टर गवतगंजी जळून खाक झाली. या आगीच्या भडक्यामुळे जवळच असलेल्या ऊस पिकात आग शिरली व ऊसही जळून खाक झाला. यामध्ये असलेले शेती पाईप व इतर साहित्य जळून नुकसान झाले आहे. तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले पण तोवर प्रयत्न करून शेतकऱ्यांनी आग विझवली. वेळीच आग आटोक्यात आले नसती तर अनर्थ घडला असता. या चार दिवसात खानापूर तालुक्यात अनेक ठिकाणी आगीची ठिणगी पडून नुकसान झाले आहे. रेल्वेचे काम सुरू असताना लोंढा जवळ आग ठिणगी पडून चार एकर जंगल जळून खाक झाले. शिवाय इदलहोंड येथे झोपडपट्टीला आग लागून चार झोपड्या जळून खाक झाल्या. होणकल येथेही काजूची बाग जळून नुकसान झाले. अशा अनेक ठिकाणी लहानसहान आगीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांनी सतर्कता राखणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *