खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील शिवस्मारकात आम आदमीच्या पत्रकार परिषदेत माहिती देताना बेळगाव उपाध्यक्ष विजय पाटील म्हणाले की, आम आदमी दिल्ली सरकारने शाळा आणि रूग्णालयाचे आधुनिकीकरण केले. दिल्लीत महिलांना मोफत प्रवास, तसेच संरक्षणही आहे. अशा अनेक सोयी, सुविद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. अशाच प्रकारे खानापूर तालुक्यात आम आदमी सक्रियपणे कार्यरत राहून तालुक्याचा विकास साधेल. खानापूर तालुक्यातुन आगामी जिल्हा पंचायतीच्या सात विभागातून तसेच तालुका पंचायतीच्या 20 विभागातून उमेदवार निवडणूक लढविणार आहे. यासाठी आम आदमी पार्टीचा सर्वोच्च प्राधान्य म्हणजे राजकारण्यातील सर्वोत्तम आणि प्रामाणिक उमेदवाराची निवड करणे, शुन्य भ्रष्टाचारासह वेगवान विकास हे उद्दिष्ट असल्याचे मत शुक्रवारी दि. 1 ऑक्टोबर रोजी खानापूर येथील शिवस्मारकात आयोजित आम आदमीच्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. प्रारंभी आम आगमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी पत्रकाराशी बोलताना म्हणाले की, आम आदमी पार्टी खानापूरचा विकास करून खानापूराच्या मध्यवर्ती कार्यालय उभारणार आहे. पत्रकार परिषदेला चंद्रकांत मेदार, लबीबहमद शेख, शिवाजी गुंजीकर, गोपाळ गुरव, मोहन मल्लीक, प्रभाकर पाटील व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी आम आदमीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta