
खानापूर : पवित्र गंगा नदीच्या काठावर विविध ठिकाणी महारथीचे कार्यक्रम नेहमी होत असतात त्या स्पर्शभूमीवर महाशिवरात्रीचे अवचित्य साधून आज शनिवारी खानापूर येथील मलप्रभानदीच्या काठावर मलप्रभेची महाआरती करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या पुढाकाराने आणी पर्यावरण घाटी तसेच दत्त पीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरती सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या महाआरती कार्यक्रमाच्या व्यासपीठावर रामनाथ नायक, श्री श्री शंभूलिंग शिवाचार्य स्वामीजी, डॉ. गौरीश भालकेकर उपस्थित होते. रामनाथ नायकजी यांनी उपस्थितांना नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करण्यासाठी गंगापूजा आणि गंगा आरती या नदीपूजेच्या प्राचीन इतिहासाबद्दल माहिती विशद केली. गौरीश भालकेकर यांनी आपल्या प्राचीन परंपरेचे जतन करण्यासाठी स्त्रीशक्तीविषयी मार्गदर्शन केले. श्री शंभूलिंग शिवाचार्य स्वामी यांनी गंगापूजा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक व्यक्त केले.
खानापूर मलप्रभा नदी काठावर आयोजित करण्यात आलेल्या महाआरती कार्यक्रमाला सुमारे पाच हजार भाविक उपस्थित होते. महाआरती नंतर नदीत तुपाचे दिवे सोडवण्यात आले. नदीच्या पाण्यात सोडण्यात आलेल्या दिव्यांमुळे एका विलक्षण नेत्रदीपक मंगलमय सोहळ्याच्या अनुभव खानापूरकरांना घेता आला.
खानापूरकरांसाठी हा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव होता.
यावेळी वाणी रमेश, दानेश्वरी पाडेकर पर्यावरण गतिविधीच्या वतीने उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta