खानापूर (प्रतिनिधी) : आवरोळी (ता. खानापूर) येथील श्री रूद्र स्वामी बेळकी आवरोळी मठाच्या आवारात परमपूज्य शांडिल्य महाराजांचा सहावा पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी दि. २ मार्च रोजी सकाळी ९.३० होणार आहे, अशी माहिती मठाधीश पं. पू. चन्नबसव देवरू स्वामी यांनी आयोजित कार्यक्रमात दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, या कार्यक्रमाला लिंगायत नेते माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुराप्पा यांचे सुपूत्र भाजप नेते बी. वाय. विजयेंद्र राज्य बीजेपी उपाध्यक्ष यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे. तर मुख्य उपस्थिती के एल ई संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कोरे, आमदार महांतेश दोड्डगौडर, माजी एम एल सी महांतेश कवटगीमठ, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, एम रुद्रेश, एम एल सी चन्नराज हट्टीहोळी, माजी आमदार दिगंबर पाटील, अरविंद पाटील, डॉ. रवी पाटील व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे सांगितले. तसेच उत्सवाला जवळपास दहा ते पंधरा हजार भाविक उपस्थित राहणार असल्याचे मठाधिपती चन्नबसव देवरू स्वामी यांनी सांगितले.
यावेळी पुण्यस्मरण कार्यक्रम पार पाडण्यासाठी कामाचे नियोजन करण्यात आले त्यानंतर पं पू चन्नबसव देवरू स्वामी यांच्या उपस्थितीत मठाच्या आवारात भगवे झेंडे घेऊन घोषणा देत फेरी काढण्यात आली.
कार्यक्रमाला खानापूर तालुका भाजपचे अध्यक्ष, बेळगांव जिल्हा भाजप उपाध्यक्ष, माजी जिल्हा पंचायत सदस्य, भाजप नेते, आवरोळीसह तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.
Belgaum Varta Belgaum Varta
