खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीला नगराध्यक्ष नारायण मयेकर, स्थायी कमिटी चेअरमन विनोद पाटील, उपस्थित होते. यावेळी बैठकीला चीफ ऑफिस आर. के. वटार, नगरसेवक माजी स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर, नगरसेवक आप्पया कोडोळी, हणमंत पुजार, नगरसेविका मिनाक्षी बैलूरकर, राजश्री तोपिनकट्टी, शोभा गावडे, सहारा सनदी, फातिमा बेपारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी प्रेमानंद नाईक यांनी प्रास्ताविक करून मागील अहवाल वाचुन दाखविला.
यावेळी प्रकाश बैलुरकर यांनी बसस्टँड समोरील नगरपंचायतीच्या बसस्टँड जवळील, बाजारपेठ, भाजी मार्केट चिरमुरकर गल्लीतील जवळपास ६८ गाळाचे भांडे जवळपास १ कोटी रुपये वसुल करायचे आहे. यावर तोडगा काय करायचे. असा सवाल उपस्थित केला.
यावर बोलताना स्थायी कमिटी चेअरमन विनोद पाटील यांनी प्रथम संबधित गाळ्याचे विज कनेक्शन कट करा. तरच गाळ्याची भाडी वसुल होतील, असे सांगितले. यासाठी चीफ ऑफिसर, नोकरवर्ग, यानी भाडी गोळा करावी. अन्यथा गाळ्याचे सवाल करावे, अशी चर्चा करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष नारायण मयेकर यांनी मागील वेळेचा अनुभव सांगत गाळेधारकाने वीष घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे यावर कोणतातरी पर्यायी मार्ग शोधा असा सल्ला दिला.
बैठकीत कामगाराच्या कायम स्वरूपी नोकरीसाठी कामगारांनी आपली व्यथा मांडली. तेव्हा सरकारच्या आदेशानुसार टप्प्याने कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.
शहरातील पाण्याच्या टाक्या महिन्यातून एकदा स्वच्छता करा, पथदिपे वेळीच बदला अशा सुचना नगरसेवकांनी केल्या. यावेळी बैठीत इतर समस्या वर चर्चा करण्यात आली.
बैठकीत नगरसेवक, अधिकारी, अभियंते कर्मचारी आदी उपस्थित होते.
आभार प्रेमानंद नाईक यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta