


खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी गुंजी विभागात संपर्क दौरा करून जनजागृती करण्यात आली. सुरूवातीला गुंजी माऊली देवीचे दर्शन घेऊन संपर्क दौऱ्याला सुरूवात करण्यात आली.
भालके बी.के., भालके पी.एच. तसेच कामतगा येथे संपर्क दौरा करून जनजागृती करण्यात आली. कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी समितीच्या कार्याचा आढावा घेत आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.
आगामी विधानसभेसाठी म. ए. समितीच्या सात शिलेदारांनी 51 हजार रु. देणगी देऊन समितीकडे उमेदवारीसाठी अर्ज दिले आहेत त्यातील एक उमेदवाराची निवड समिती करणार आहे. समितीने निवड केलेल्या उमेदवाराच्या पाठीशी सर्वजण राहणार असल्याचे वचन यावेळी देण्यात आले. इच्छुक उमेदवार गोपाळ पाटील, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, रुक्मांना झुंजवाडकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केली.
माजी आमदार दिगंबर पाटील यांनी सांगितले की, भालके बी.के.वासीय नेहमीच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत व यापुढे देखील त्यांचा पाठिंबा समितीलाच असणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
गुंजी विभाग प्रमुख म. ए. समितीचे उपाध्यक्ष कृष्णा मनोळकर, खानापूर समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, दीपक देसाई, विठ्ठल गुरव, राजाराम देसाई, अमृत पाटील, नारायण पाटील, सयाजी पाटील, यल्लाप्पा पाटील, बबन सुतार, शंकर पाटील, परशुराम आणगडकर, अरुण आणगडकर, अशोक गवाळकर, बाळू जोशीलकर, परशराम नाईक, हनुमंत जोशीलकर, मोनेश्री पाटील, महादेव जोशीलकर, नारायण जोशीलकर, अंकुश नाईक, महाबळेश्वर आणगडकर, मारुती घाडी, नारायण रा पाटील, ज्ञानेश्वर आणगडकर, मष्णू जोशीलकर, कल्लाप्पा कौदलकर, युवा कार्यकर्ते पुंडलिक जोशीलकर, विक्रम पाटील, मनोज पाटील, हणमंत सुतार, नामदेव जोशीलकर, सुरेश जोशीलकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta