खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जांबोटी पी के पी एस सोसायटीच्या चेअरमन धनश्री सरदेसाई , के एस पी एस टी संघाचे कार्यदर्शी के एच कौंदलकर उपस्थित होते.
तर प्रमुख पाहुण्या म्हणून बीईओ राजश्री कुडची, पीईओ श्रीमती मिरजे, बीईओ ऑफिसच्या महिला वर्ग, मुख्याध्यापक एम व्ही कुंभार आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून म. ए. समिती नेते निरंजन सरदेसाई हजर होते.
यावेळी मुख्याध्यापक एम व्ही कुंभार यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
यावेळी बीईओ राजश्री कुडची यानी विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन केले. तर वक्त्या धनश्री सरदेसाई म्हणाल्या, मुलीनी शिक्षणापासून दुर न जाता उच्च शिक्षण घ्या व जीवनात यशस्वी व्हा, असे आवाहन केले.
तर आमटे शाळेचे शिक्षक दिपक धामणकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
जागतिक महिला पारडण्यास कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा खानापूर घटक कार्यदर्शी सौ. ए. ए. फर्नांडीस व इतर शिक्षिका यांनी परिश्रम घेतले. यावेळी सीआरपी व्ही एम दळवी, उपस्थित होते.
स्वागत सौ. एम आर पाटील यांनी केले. आभार सौ. व्ही व्ही किल्लेकर यांनी मानले.