खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जटगे गावात नव्याने उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिरात पुजण्यात येणाऱ्या नुतन हनुमान मंदिर मिरवणूक रविवारी दि. १२ रोजी ढोल ताशाच्या गजरात व भंडाऱ्याची उधळण करत गावातील चव्हाटा देवस्थान पासुन सकाळी १० वाजता गावच्या पंचाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली.
जटगे (ता. खानापूर) गावात सकाळपासून घरासमोर रंगीत रांगोळ्या टाकून, पताका बांधुन सजावट करण्यात आली होती.
यावेळी प्रत्येक घरासमोर सुवासिनीनी आरती करून हनुमान मूर्तीचे दर्शन घेत होत्या.
प्रत्येक गल्लीत घरोघरी हनुमान मूर्तीची पूजा होत होती.
यावेळी ट्रॅक्टरची सजावट करण्यात आली होती. हनुमान मूर्तीच्या मिरवणुकीत गावचे पंच, जिर्णोद्धार कमिटीचे सदस्य, गावचे नागरीक, युवा वर्ग, माहेरवाशीन सह बालक मिरवणुकीत सहभागी झाले होते.
संपूर्ण जटगे गाव भंडाऱ्याने न्हाऊन निघाले होते. भक्तगण भंडारा उधळत मिरवणुकीत सहभागी झाले होते.
रात्री उशीरापर्यंत हनुमान मूर्तीची मिरवणुक काढण्यात आली. शेवटी हनुमान मंदिर जवळ मिरवणुकीची सांगता झाली.
जटगे गावातील नुतन हनुमान मूर्तीची मिरवणुक सुरळीत पार पाडण्यासाठी सागर पाटील, महाबळेश्वर पाटील, पुंडलिक पाटील, यादव पाटील, वामन लोटूलकर, बाळपा पाटील, गोपाळ मळीक, कल्लाप्पा मळीक, रामनिंग हलशीकर आदींनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta